वय वर्षे ४७००!

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली-‘जगातील सर्वात वृद्ध झाड, त्याचे ४७०० वर्षे वयमान !’ संशोधकांनी केलेला दावा खरा असेल तर किती विस्मयकारक आहे ही गोष्ट! या झाडाने पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या , मानवांच्या कितीतरी पिढया पाहिल्या असतील. त्याच्याबरोबरच जन्माला आलेल्या इतर प्रजातींच्या कितीतरी झाडांचे उमलणे, मोठे होणे, वादळांत उन्मळून पडणे, माणूस नावाच्या प्राण्याने त्रास दिला नाही तर आयुष्य यशस्वी जगून मृत्यु पावणे अशा कितीतरी गोष्टींची त्याच्या स्मृतिकोशात गर्दी झालेली असणार. झाडांना मानवांप्रमाणे शोक, हर्ष, खेद, जिवलगांच्या मृत्युमुळे झालेले मनावर आघात अशा भावना असतील का? झाडांना संवेदना असतात म्हणे. आपल्या अंगाखांद्यावर पक्ष्यांच्या, आपल्या आजूबाजुस प्राण्यांच्या, मानवांच्या कितीतरी पिढ्यांचे जगणे मरणे, अस्तित्व टिकविण्यासाठीचे झगडे त्याने पाहिले असतील. इतकी वर्षे हा स्मृतिभार पेलून ते थकले नसेल? इतक्या वर्षांच्या चांगल्यावाईट आठवणींनी त्याला केंव्हातरी गहिवरून येत नसेल? ४७०० वर्षांच्या हे महान वृक्षराजा या पामराचा तुला सलाम!
This article is written in Marathi language. The topic: The oldest tree in the world!

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...