तुकारामांच्या भेटीला जगभरातील ‘नेटकरी’!

शेखर जोशी,मुंबई (दै. लोकसत्ता )
महाराष्ट्रातील सर्व संतांनी ज्या पंढरीच्या विठुरायाचे आपल्या अभंगातून वर्णन केले आणि ज्याला आपला सखामानला त्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्यादिवशी पंढरीची वारी करीत असतात. पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणेच सध्याच्या संगणक आणि इंटरनेटच्यामहाजालातनेटकरीविविध संकेतस्थळांना भेट देत असतात. संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा आणित्याच्याविषयी माहिती देणाऱ्या www.tukaram.com या संकेतस्थळालाही गेल्या काही वर्षांत केवळ महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगभरातून १३५ देशांमधीलनेटकरीनित्यनेमाने भेट देत आहेत.
संत
तुकाराम महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने, १७ फेब्रुवारी २००२ या दिवशी हे संकेतस्थळ सुरू करण्यातआले आणि गेल्या सात वर्षांत या संकेतस्थळाला जगभरातून लाखो लोकांनी भेट दिली आहे. सध्या जगातील १३५देशांमधील लोक नित्यनेमाने या संकेतस्थळाला भेट देत असून त्यात इंग्लंड, अमेरिका या देशांसह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बहारिन, बांगलादेश, बेल्जियम, ब्राझील, कोलंबिया, कतार, जर्मनी, ग्रेटब्रिटन, नेपाळ, नेदरलॅण्ड आणि अन्य अनेक देशांचा समावेश आहे.
मराठीसह
हिंदी, कोकणी, सिंधी, संस्कृत, गुजराथी, बंगाली, उडिया, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आदीभारतीय प्रादेशिक भाषांमध्ये हे तसेच इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन, स्पॅनीश, नेदरलॅण्ड आदी परकीय भाषेतही हे संकेतस्थळ आणि त्यावरील लेख माहिती उपलब्ध आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हेसंकेतस्थळ समर्पित करण्यात आले असून या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, डॉ. सदानंदमोरे, देवेन राक्षे आणि अन्य सहकाऱ्यांची मोलाची मदत झाली आहे. पेशाने सिव्हिल इंजिनीअर असणारे दिलीप धोंडे हे या संकेतस्थळाचे प्रकल्प समन्वयक आहेत.या संकेतस्थळावर देहू संस्थानने उपलब्ध करून दिलेलीअभंगगाथा असून ती डाऊनलोड केली तर सर्व अभंग वाचायला मिळू शकतात. संकेतस्थळावर संत तुकाराम यांचे चरित्र वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले असून हा अनुवाद केदारनाथ नीलकंठ पंचभाई (गुजराती), सुरेश आमोणकर (कोकणी), आशा गुर्जर डॉ. देवीदास खरवंडीकर (संस्कृत), विरुपाक्ष कुलकर्णी (कन्नड), भालचंद्र आपटे (तेलगू), एन. . विश्वनाथ अय्यर (मल्याळम), एन. गोपाल (तामिळ) आदींनी केलेला आहे .

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...