अमिताभला मराठी येत नसल्याची खंत?

अमिताभला मराठी येत नसल्याची खंत वाटत असेल काय? छे! छे! मुळीच नाही.
पुणे, मुंबई अशा महानगरांतील मराठी अगदी मोडकळीस येऊ पाहत आहे. शुध्द मराठीत(हिन्दी/इंग्लिश शब्द वापरण्याचे टाळून) संभाषण करीत असलेले लोक अभावानेच दिसतात. मराठी लोकच आपणहून तेरे को, मेरे कू करीत बिहारी, बंगाली, कन्नड़, केरळी इत्यादी लोकांशी संपर्क साधत असल्यामुळे आपण ज्या शहरात वावरतो तेथे (नोकरीचे ठिकाण सोडून का होईना) दोनचार शब्द तरी मराठीत बोलावे लागतील अशी इच्छा त्याना मुळीच होत नाही. इतर राज्यांत तुम्ही मराठीतच काय पण इंग्रजीत जरी संवाद साधू पहाल तरी तुम्हाला परका म्हणूनच पाहिले जाईल. निदान मराठी माणसांनी आपसात तरी मराठीत बोलावे (इंग्रजी हिंदीची भेसळ करता) म्हणजे तुमच्या नातूपणतुपर्यंत तोडकीमोडकी का होईना मराठी शिल्लक राहिल. इतकी वर्षे महाराष्ट्रात राहूनही अमिताभसारख्या कित्येकांना मराठीत दोनचार ओळीही बोलणे शिकावे अशी कणभरही इच्छा होत नही याचे मूळ कारण आपल्यालाच आपल्या मातृभाषेचा अभिमान नाही हेच असावे !
Related Posts Plugin for WordPress, Blogger...