बिपीओ,आयटी करीता आचारसंहिता


मध्यंतरी
केंद्रीय मंत्र्यानी बीपीओ,आयटी या क्षेत्रातील कामगारांसाठी काही आचारसंहिता असावी असे मत व्यक्त केले त्यावर केवढा गहजब झाला. परंतु या क्षेत्रातील लोकांसाठी काहीतरी आचारसंहिता असणे आवश्यक आहे असे मला वाटते. सामाजिक जाणीव नसलेले, नैतिक अनैतिक काय याची जाणीव नसलेले, आईबापाचा, समाजाचा कसलाही धाक नसलेले, बेबंद शरीरसुखासाठी हपापलेले, सिगरेट दारू पिणे म्हणजेच enjoyment असा गोड गैरसमज करून घेतलेले अशा विविध प्रकारात या क्षेत्रातील ७०% तरुण तरुणी येतात. विशेष म्हणजे यातील बरेचसे आपापल्या क्षेत्रात अतिशय हुशार असतात. I.Q.(intelligent quotient) जास्त, पण E.Q.(emotional quotient) म्हणजे भावनिक बुध्यांक जवळजवळ शून्य असलेली ही तरुणाई कपडे बदलावेत तसे आपले जोडीदार बदलत असते. मानवी मूल्यांचे हे अवमूल्यन चिंतेचा विषय बनत चालले आहे.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...