दिल्ली बोले,राज्य हाले

मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यास विरोध करणारे , इतकेच नव्हे तर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्यालाच नकार असलेल्या आयुष्यभर महाराष्ट्राविषयी असूया मनात बाळगून असलेल्या दिल्लीकर नेत्यांना त्या वेळच्या मराठी मंत्र्यानी मनोभावे साथ दिली . त्यांचाच वारसा मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री समर्थपणे चालवत आहेत. कुठल्याही मुद्दयावर ठामपणा नाही, सर्वकाही दिल्ली बोले,राज्य हाले या स्वरूपाचे चालू आहे असे वाटते . देशभरात होणारे जातीय दंगे,अतिरेक्यांचे हल्ले,जातीयवाद, विविध राज्यांतील बेरोजगारी, शेतकर्यांच्या आत्महत्या हे प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी संपता संपत नाहीत .
मतांसाठी अल्पसंख्यकांचे लांगूलचालन, प्रादेशिक टोकदार अस्मिता, निवडणुकीत गुंडांना उमेदवारी या प्रश्नांवर वर्षानुवर्षे काहीच तोडगा नाही.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...