बिहारी नेत्यांचा थयथयाट

खंडणीराज, गुंडगिरी, अपहरण, दलित-उच्चवर्णीय यांतील वाढती तेढ यांना बिहारची संस्कृती बनवण्याचे काम लालूप्रसादासारख्या नेत्यांनीच केले. भ्रष्टाचाराच्या चरकात राबडीदेवींसह लालू अडकले.बिहारातल्या बेकारी,गरिबीवर उपाय शोधण्याऐवजी ह्या बेकारांच्या लोंढ्यांना महाराष्ट्रासारख्या सधन राज्यात जाण्यासाठी रेल्वेच्या खास गाड्या सोडण्यात मग्न राहिले. बिहारला सुधारणा विकास यांचा स्पर्शही होऊ नये अशीच या नेत्यांची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्रातील वादाला चुकीच्या भूमिकेतून विकृत दृष्टीने रंगवण्यास हे बाष्कळ बडबड करणारे अमरसिंह ,लालू, अबू आजमी सारखे राजकारणीच जबाबदार आहेत. तसेच हे प्रकरण व्यवस्थित हाताळता आलेले दिल्लीपुढे लोटांगण घालणारे महाराष्ट्र शासन देखील जबाबदार आहे.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...