मुजोर ऑस्ट्रेलियन खेळाडू

भारतीय खेळाडूंना चिडण्यास प्रवृत्त करणारया व सतत शिवीगाळ करून त्यांची एकाग्रता भंग करणे यालाच खेळाची संस्कृती समजणारया उध्दट, मुजोर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना IPL मध्ये खेळू देऊ नये. शेन वाटसन, सायमन कटिच हे शिव्या देवून गंभीरला भडकवताना विडियो फूटेज मध्ये प्रेक्षकाना स्पष्ट दिसतात पण सामनाधिकारी ख्रिस ब्राडला ते दिसत नाही.याला काय म्हणावे? पोंटिंग अणि टीम पारितोषिकवितरण सोहळ्याच्या वेळी शरद पवारांना सरळसरळ टपोरी तरुणांसारखी धक्काबुक्की करतात, याला(शरद पवाराना) येथून हाकला अशी खूण करतात. तरीदेखील BCCI, ICC, व तेथे उपस्थित पदाधिकारी याबद्दल ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कानउघाडणी करण्यास कचरले. याचा परिणाम ते अधिकच शेफारले. मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंना शिवीगाळ व त्यांच्याशी गैरवर्तन करणारया ऑस्ट्रेलियन खेळाडूंना २/३ सामन्यांची बंदी किंवा त्यांच्यावर गंभीर आरोप लादले गेलेत असे चित्र दुर्मिळच आहे- जवळजवळ नाहीच! अशा गोष्टींचा निषेध म्हणून एखादे वर्ष तरी BCCI ने अशा देशाबरोबर मॅचच ठेवू नये असे अनेकांचे मत असणार यात शंकाच नाही.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...