अतिरेक्यांशी मुकाबला

सुप्रीम कोर्टाने ज्याला संसदेवर हल्ल्याचा कट केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली आहे त्याला फाशीवर लटकवण्याची हिम्मत नसलेले सरकार दहशतवादी हल्ले कसे थांबवणार आहे? याआधी बऱ्याच खुनी गुन्हेगारांना फाशी देण्यात आलेली असताना तेव्हा बरं मानवाधिकार सारखे मुद्दे कोणाला सुचले नाहीत? अफजल गुरु बद्दल हे कोणते खास धोरण आहे म्हणून त्याला फाशी होत नाही? कृपया सरकारने ते जगजाहीर करावे.
लोकाना खात्री आहें की, यावेळीसुध्दा मनमोहनसिंग काही कठोर कृती करणार नाहीत. गेल्या काही महीन्यांत दिल्लीपसून बंगलोर तसेच आसामपासून मुबईपर्यंत बाँबहल्ल्यांची एक मालिकाच भारतात घडली. पण नागरिकांच्या जिविताची रक्षणासाठी एकही पाऊल उचलले नाही. बाँबहल्ल्यांचा संशयित अतिरेकी म्हणून ऑस्ट्रेलियात एक भारतीय मुस्लिम डॉक्टरला पकडण्यात आलं होतं तेंव्हा आपल्याला रात्रभर झोप लागली नाही असे म्हणणारया पंतप्रधानाना अतिरेकी हल्ल्यांमध्ये मारले गेलेल्या हजारो भारतीयांबद्दल अशी आत्मीयता वाटते काय ?
लालू व पासवान सिमीवर बंदी घालायला विरोध करतात . दहशतवादी कृत्यांबद्दल संशयित म्हणून अटक केलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मदत देण्याचा निर्णय घेणारया विद्यापीठाच्या कुलगुरूंना अर्जुनसिंग पाठिंबा देतात . अशा देशविघातक विचारसरणीचे लोक दहशतवादाविरुध्द कसा लढा देणार आहेत?
सर्वात वाईट गोष्ट ही आहे की, हे सर्वजण सर्वच भारतीय मुस्लिमाना अतिरेकी समजतात. तसे नसते तर अफजल गुरुला फाशी दिल्यावर आपली मुस्लिम मतपेढी बंद होईल अशी त्यांना भीती का वाटावी? अशा मतपेढीच्या राजकारणाने कोंग्रेसने सर्वांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे काम चालवलं आहे .

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...