महामार्गावरील ढाबे

जवळजवळ प्रत्येक महामार्गावर असणारे ढाबे हे लांब पल्ल्याचा प्रवास करणारांसाठी रात्री बेरात्री जेवायची सोय म्हणून ठीक असले तरी त्यामुळे पूर्वी त्याच परीसरातील गावांचे शांत स्वच्छ वातावरण गढूळल्यागत झाले आहे.
प्रामाणिकपणे ढाबा चालविणारे फारच कमी लोक असतील. सर्रास दारुविक्री, अवैध धंदे, रात्रीच्या/गुन्हेगारांच्या दारू पार्ट्या यांची लागण सहसा गावांना होत नसे. शेतीचा, इतर उत्पन्नाचा पै पैसा जास्तीचा जरी आला तरी अशा वाईटगावाजवळ नसल्याने हे पैसे निरर्थक उधळून आपल्या आयुष्याची बरबादी करण्याचा विचार लोकांच्या मनात यायला कारण नसे. पण आता सारेच बदलत आहें. वाईट गोष्टींकडे माणसाचे मन झपाटयाने ओढ घेते-त्या गोष्टी हाकेच्या अंतरावर असल्यावर तर मन मोहाला बळी पडल्याशिवाय राहत नाहीं. पूर्वीच्या सज्जन,पापभिरू ,चांगुलपणाचा गावभर दरारा असलेली माणसेच आता गावाकडे कमी होत चालली आहेत. फार वाईट गोष्ट आहे.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...