संशयित भाडेकरू

पुणे, मुंबई इतर छोट्यामोठ्या शहरातील स्थानिक लोक केवळ पैशाच्या मोहाने मूळ नाव गाव याची फारशी चौकशी ना करता त्रयस्थ, अपरिचित लोकांना आपल्या बंगल्यांत, खोल्यांत बिनधास्त आश्रय देतात. असे लोक उच्च शिक्षण, नोकरी यांसाठी आल्याचे भासवातात. त्यांच्या बेजबाबदार, उच्छृंखल वागण्याकडे शेजारीपाजारी यांकडूनही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे सहाजिकच अशा लोकांत कोणी दहशतवादी, गुन्हेगार असले तर ते गुन्हा करून पळून गेल्यावरच मग त्यांचे खरे स्वरुप उघड होते . त्यामुळे अशा संशयित भाडेकरुबद्दल वेळीच पोलिसाना कळवणे हा गंभीर गुन्हा मानला जावा. अशा गुन्हेगार लोकांना शिधापत्रिका, वाहनपरवाना, रहिवासी दाखला, पासपोर्ट, बॅंक खाते उघड़णे अशा विविध गोष्टी गैरमार्गाने उपलब्ध करून देणारया नागरिकांविरुध्द देशद्रोहाचे खटले भरले पाहिजेत. तरच अशा लोकाना कायद्याचा धाक बसेल.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...