वर्षभरात अडीच हजार भारतीय संकेतस्थळे ‘हॅक’ पाकिस्तानी सायबर हल्ल्याचा धोका!

अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर लढण्यात येणाऱ्या युद्धाबरोबरच भारतीयसायबरस्पेसमध्येहीअतिरेक्यांनीधुमाकूळ घातला असून गेल्या वर्षभरात सुमारे अडीच हजार भारतीय संकेतस्थळेहॅककरण्यात आली आहेत! मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानी सायबरचाच्यांच्या कारवायांची वाकडी नजरही भारतीयसंकेतस्थळांवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमया संस्थेच्या माध्यमातून भारतीयसायबरस्पेसचे संरक्षण केलेजाते. त्याचप्रमाणे देशभरातील संकेतस्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांची नोंदही ठेवण्यात येते. गेल्या वर्षभरात सुमारेअडीच हजार संकेतस्थळे सायबरचाच्यांचे लक्ष्य ठरली आहेत. त्यामध्ये शासकीय संकेतस्थळांचे प्रमाण सर्वाधिकआहे. ‘डॉट इनअशा डोमेनमधील दोन हजार ३८४ संकेतस्थळांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याच्या खालोखालव्यावसायिक वापरासाठी सुरू करण्यात आलेल्याडॉट कॉमसंकेतस्थळांचा समावेश आहे. त्यांची संख्या एकहजार ३७४ एवढी आहे. स्वयंसेवी संस्था आदींनी सुरू केलेल्याडॉट ओआरजीया घटकामधील २३५ संकेतस्थळे, तरडॉट नेटविभागाची १४४ संकेतस्थळेहॅककरण्यात आली आहेत.
पुण्यामध्ये
दोन हजार साली गाजलेल्या सायन्स काँग्रेसचे संकेतस्थळहॅककरण्यात आले होते. त्यामध्येहस्तक्षेप करून पाकिस्तानची भलामण करणारा मजकूर प्रसारित करण्यात आला होता. मुंबईतील हल्ल्यांनंतरआता अशाच पाकिस्तानी सायबर दहशतवादाचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीयसंगणकीय नेटवर्कहॅककरून पाकिस्तानीसायबरचाचेधुमाकूळ माजवतील, असा इशारा गुप्तचर खात्याने दिलाआहे. ‘सायबरचाच्यांकडून संगणकीय नेटवर्कमध्ये जाणीवपूर्वक व्हायरस सोडले जातात आणि नेटवर्क ठप्प केलेजाते. या कारवायांमधून दुसऱ्याचे आर्थिक नुकसान करणे किंवा गोपनीय माहितीसाठा पाहणे, असे हेतू साध्य केलेजातात. हे प्रकार टाळण्यासाठीव्हायरसरोधकसंगणकप्रणाली अस्तित्वात आहेत. परंतु, पाकिस्तान सायबरदहशतवाद्यांच्या कृत्यांपुढे या प्रणाली कुचकामी ठरतील,’ असा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

-लोकसत्ता वृत्तान्त




No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...