‘शहरीकरण’ म्हणजे विकास नव्हे

देशात ८३ कोटी जनता जेमतेम वीस रुपये रोजंदारीवर गुजराण करते (!) आजही ६४ टक्के कुटुंबांसाठी प्रातर्विधीची सोय नाही. ८५ टक्क्यांहून अधिक जनता पारंपरिक जळणफाटा इंधन म्हणून वापरतेय. या पाश्र्वभूमीवर वृत्तपत्रातबातमी येते, ‘३६ कोटी मोबाइलधारक आहेत’. जादुगाराप्रमाणे आकडेवारीचा मारा केला की आजहीजनमानसदबकून जाते, त्याला न्यूनगंड येतो. हा वास्तविक सामाजिक अभिसरणाचा दैवदुर्विलास आहे, पण वाढलेला पोकळ मध्यमवर्ग, गुलामी मनोवृत्ती, इंग्रजीचा गंड आणि गोऱ्या रंगाचं आकर्षण या जंजाळात सापडलेला भारतीय निर्बुद्धपणे होणारे शहरीकरण म्हणजे विकास समजतो यांसारखा दैवदुर्विलास तो कोणता?
आकडेवारी
देण्याने बौद्धिक पातळी उंचावल्याचे समाधान वाटत असले तरी मूळ प्रश्न सुटत नाही जगण्याचीगुणवत्ता उंचावत नाही. मुख्य म्हणजे जगणाऱ्यांची गुणवत्ता हाच आपल्याकडे कधी चर्चेचा मुद्दा झालेला नाही. मतपेटीवर नजर ठेवून केलेले निर्बुद्ध, बिनडोक शहरीकरण म्हणजे विकास ही ठाम समजूत आहे. उदाहरणार्थबेसुमार, बेशिस्त वाढलेली मुंबई तिची उपनगरे त्याला चिकटूनच अस्तित्वात आलेली भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथसारखी निम्नशहरे..असल्या विकासात २१ व्या शतकातही सत्ताधारी राज्यकर्त्यांची राहणी मध्ययुगीनउमरावांसारखी आणि जनतेलाही तिच्या वकुबानुसार सत्ताधीश मिळताहेत!
अस्तंगत
झालेल्या सोव्हिएत युनियनच्या रशियाची मारिया शारापोव्हा ही सायबेरियात (एकदम मागास टापू) जन्मास आलेली.. वडील लाकूडतोडेच म्हणावेत, त्यांना मायबोलीशिवाय इतर भाषेचा गंध नाही; परंतु त्यांच्या मुलीला ते कुणाचीही चिठ्ठीचपाटी घेता, वशिल्याशिवाय, टेनिसमधील विश्वसम्राज्ञी करू शकतात! दुसरी यानायान्कोविच पोलवॉल्टपटू. विश्वविजेती. सुर्जी बुबका युक्रेनवासी झाला त्या खेळात यानाने प्रावीण्य मिळविले जगज्जेती झाली. तिचे वडील प्लंबर. आपल्या देशात अथवा उपखंडात स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांत हे काशक्य होत नाही?
मार्क्
सच्या विचारांना मूर्तस्वरूप देणाऱ्या लेनिनच्या व्यवस्थेत काहीतरी चिरंतन मूल्ये असावीत. अंगभर वस्त्रदेखील नशिबी नसणारे गरीब पाहून स्वत: फक्त पंचावर राहणारे महात्मा गांधी की स्कूटरवर जोडप्यासमवेत असणारे लहान मूल पाहून नॅनो काढणारे रतन टाटा..? कुठला आयकॉन स्वीकारायचा हा खरा प्रश्न आहे! स्वत:च्या आर्थिक लाभासाठीच सत्तास्पर्धेत गुंतलेल्या कामगार संघटना, संघटनेवर निव्वळ ताबा ठेवण्यासाठी व्यवहाराच्यानावे सातत्याने होणाऱ्या भ्रष्ट तडजोडी आणि दुसरीकडेमतपेटय़ावाढवणारे तत्त्वशून्य राजकारणी यामुळे राजकारणाला पार अवकळा आलीय.

राजन बावडेकर,

दादर
, मुंबई
लोकमानस(लोकसत्ता साठी )

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...