मुंबईत ‘हरवतात’ रोज सरासरी १७ मुले!

अजित गोगटे, मुंबई,दै. लोकसत्ता

सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबई महानगरातपाय घसरण्याच्या१५ ते २५ वर्षे या वयोगटातील दररोज सरासरी१० मुली तर सात मुलगेहरवतातअसे पोलिसांच्या


मिसिंग पर्सन्सब्युरोकडून मिळालेल्या गेल्या१० वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. पोलिसांच्या दफ्तरी यांची नोंदहरवलेल्याव्यक्तीया सदरात होत असली तरी सभोवतालची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता यापैकी बहुतांश मुली मुलेघर सोडून पळून गेलेली असतात, हे उघड गुपित आहे.
केम्प्स
कॉर्नर येथे राहणारे एक सामाजिक कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबईत गेल्या १० वर्षांत पोलिसांकडे कितीव्यक्ती हरविल्याच्या फिर्यादी नोंदविल्या गेल्या, त्यापैकी किती पुन्हा सापडल्या हरवलेल्या तसेच सापडलेल्याव्यक्तींची विविध वयोगटानुसार वर्गवारी अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती. ‘मिसिंग पर्सन्सब्युरोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वि. . मेरु यांनी ही आकडेवारी कोठारी यांना उपलब्ध करून दिली आहे. याआकडेवारीचे विश्लेषण करता असे दिसते की १५ ते २५ वर्षे याधोकादायक वयोगटातील २७,९३२ मुले तर ३९,४६६मुली गेल्या १० वर्षांतहरविल्याच्या’ (म्हणजेच घर सोडून गेल्याच्या) तक्रारी पालकांनी पोलिसांकडे नोंदविल्या. या वयोगटातील १० मुली सात मुले मुंबईत दररोज सरासरीहरवतातअशी सरासरी यावरून दिसून येते. यावयोगटातीलहरविणाऱ्यामुला-मुलींची संख्या गेल्या १० वर्षांत उत्तरोत्तर वाढत जाणारी आहे. हा कल वाढत्याकौटुंबिक विसंवादाचाही द्योतक असल्याचे समाजशास्त्रज्ञांना वाटते.
पळून गेलेलीया वयोगटातील बहुतांश मुले-मुली कालांतराने सापडत असली तरी सर्वाचे पालक सुदैवी असतातअसे नाही. गेल्या १० वर्षांत सुरुवातीसबेपत्ताम्हणून नोंद झालेल्या कालांतरानेमयतसापडलेल्या यावयोगटातील मुला-मुलींची संख्या १७१ एवढी होती. यातही पळून जाऊन किंवा पळवून नेऊन नंतर मयतआढळलेल्या मुलींची संख्या (११४) मुलांपेक्षा (५७) दुप्पट असल्याचे आढळते. सर्व वयोगटांचा विचार केला तरबृहन्मुंबईत वर्षांला सरासरी १६,४५५ व्यक्तीबेपत्ताझाल्याच्या नोंदी पोलिसांकडे केल्या जातात असे ही दशवार्षिकआकडेवारी सांगते. गेल्या १० वर्षांत सर्व वयोगटातील एकूण ,६४,५५४ व्यक्तीबेपत्ताझाल्या. त्यापैकी ,४९,२२६कालांतराने सापडल्या तर ,३०९ व्यक्तींचा शोध लागू शकलेला नाही.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...