हिंदू साम्राज्याची अंकोरवटचे मंदिर देतेय साक्ष

-अनंत बागाईतकर,( दै. सकाळ ) मधून संपादित
शिएम रीप-अंकोरवट (कंबोडिया) - इतिहास विविध रूपांमधून माणसांच्या समोर येत असतो. प्राचीन इमारती, वास्तू, शिल्पे व स्थापत्यरचना ही त्यातली काही रूपे! निर्जीव "पत्थरात' थिजलेला तो ऐतिहासिक ठेवा असतो. अंकोरवट त्याचेच एक महाकाय रूप! भगवान श्री विष्णूला केंद्रस्थान देऊन बांधलेले हे बाराव्या शतकातील मंदिर तत्कालीन हिंदू धर्माच्या साम्राज्यविस्ताराची साक्ष देत वर्तमानात जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले आहे. सुमारे 20 ते 25 लाख पर्यटक दर वर्षी या स्थळाला भेट देतात.

मूळ विष्णूचे मंदिर असलेल्या या स्थळी आता विष्णूची जागा भगवान बुद्धांनी घेतली आहे. विष्णूची एका हातावर डोके ठेवून लवंडलेल्या अवस्थेतील मूर्ती भारतात अनेक ठिकाणी (केरळमधील पद्मनाभ मंदिर) सापडते. त्याच अवस्थेतील बुद्धाची मूर्ती सध्या गर्भगृहात स्थापित झालेली आढळते. बौद्ध धर्माचा हा प्रभाव आहे.

अंकोरवट मंदिर दुसऱ्या सूर्यवर्मन राजाने बांधले. त्या वेळी हिंदू धर्माचा प्रभाव होता. परंतु काळाच्या ओघात व विशेषतः चौदाव्या शतकात या प्रदेशात बौद्ध धर्माचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यानंतरच भगवान विष्णूंची जागा बुद्धांनी घेतली. अतिशय रमणीय असा हा परिसर असून, प्रत्यक्ष मंदिर एक चौरस किलोमीटरमध्ये वसलेले आहे. मंदिराची बाहेरची किंवा कुंपणाची भिंत तेराशे ते पंधराशे मीटर आहे. अंकोरवट मंदिर चारही बाजूंनी लहान-लहान सरोवरांनी वेढलेले आहे. ही सरोवरे कमळांनी भरलेली आहेत. सर्वत्र शुभ्रधवल, जांभळी, गुलाबी अशी कमळे फुललेली असतात. त्यामुळे अंकोरवटचे पाचही प्रमुख घुमट कमलपुष्पाचीच प्रतिकृती आहेत. कंबोडियन माणसासाठी अंकोरवट विलक्षण अभिमानाचा विषय आहे. त्याची प्रचिती म्हणूनच कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर या घुमटांना स्थान देण्यात आले आहे.

कंबोडियात काही काळ राज्य केलेल्या पोल पॉट या क्रूर व जुलमी राज्यकर्त्याची राजवट 1979-80 मध्ये उलथविण्यात आली. त्यानंतर तो व त्याचे समर्थक (ख्मेर रुज) जंगलात पांगले. पोल पॉट व त्याच्या काही सैनिकांनी अंकोरवटमध्ये बळजबरीने प्रवेश करून तेथे आश्रय घेतला. पोल पॉटने कंबोडियात अतोनात अत्याचार केले. कंबोडियन इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला; पण अंकोरवट मंदिराला धक्काही लावण्याचे धाडस तो करू शकला नाही. या मंदिरात त्याने आश्रय घेतला होता. परंतु मंदिराला त्याने काही केले नाही. त्याला येथून हुसकाविण्यासाठी चकमकी झाल्या. त्या गोळीबाराच्या खुणा अद्यापही मुद्दाम दाखविल्या जातात.

अंकोरवट परिसरात परदेशी माणसाला जागा खरेदी करता येत नाही. येथील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी लोकसंख्या वाढू दिली जात नाही. त्यासाठी या भागात इतर भागातून स्थलांतर करण्यावरही प्रतिबंध आहेत. अर्थात कंबोडियन सरकारशी करार करून व दीर्घ भाडेपट्ट्याने जमीन घेऊन हॉटेल व्यवसाय केला जाऊ शकतो.

अंकोरवट कंबोडियाचे मुख्य चिन्ह
कंबोडियाच्या मानसन्मानाचे अंकोरवट मुख्य चिन्ह आहे. टी-शर्टापासून सर्वत्र अंकोरवटच्या खुणा सार्वत्रिक आहेत. येथील सर्वाधिक खपाच्या लोकप्रिय बिअरचे नावदेखील "अंकोर' आहे. "अंकोर' म्हणजे "नगर' आणि "वट' म्हणजे "मंदिर'; म्हणजेच मंदिरांचे नगर असा या परिसराचा उल्लेख केला जातो. अंकोर शब्दाची उत्पत्ती "नगर-नकर-अन्कोर' अशा पद्धतीने झाल्याचे सांगितले जाते।
[

Angkor Wat (khmer: អង្គរវត្ត) is a Hindu temple complex at Angkor, Cambodia, built for the king Suryavarman II in the early 12th century as his state temple and part of his capital city. As the best-preserved temple at the site, it is the only one to have remained a significant religious centre since its foundation — first Hindu, dedicated to the god Vishnu, then Buddhist. The temple is at the top of the high classical style of Khmer architecture. It has become a symbol of Cambodia, appearing on its national flag, and it is the country's prime attraction for visitors.

Angkor Wat combines two basic plans of Khmer temple architecture: the temple mountain and the later galleried temple, based on early South Indian Hindu architecture, with key features such as the Jagati. It is designed to represent Mount Meru, home of the devas in Hindu mythology ]

-From wikipedia.org

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...