आपण दररोज रस्त्यावर, कार्यालयात, दुकानात शेकडो माणसांना बघतो. त्यापैकी काही परिचित असतात तर बहुतांश पूर्णतः अनोळखी असतात. नाव, गाव माहीत नसले तरी बऱ्याच लोकांना आपण त्यांची देहयष्टी, उंची, चेहरा, केसांचा रंग किंवा आवाज यावरून बिनचूक ओळखू शकतो. काही चेहरे किंवा आवाज तर अविस्मरणीय असतात (जसे मधुबाला किंवा अमीन सयानी). स्वभाव किंवा आचार-विचार यापेक्षा शारीरिक निकषांवरचप्रत्येकाची प्राथमिक ओळख अवलंबून असते. आश्चर्य म्हणजे अगणित लोकांची क्लिष्ट पण इत्यंभूत माहितीवर्षानुवर्षं जमा करणे, तिचे वर्गीकरण, साठवण आणि आवश्यक तेव्हा ती आठवणे ही प्रगल्भ मानवी मेंदूचीओळख आहे. तथापि लोकसंख्या आणि मानवी मर्यादा विचारात घेऊन हे जटील काम करण्यासाठी आता महाकायसंगणक सज्ज झाले आहेत. मानवी इतिहासातील सर्वात मोठी लोकचळवळ असं ज्या घटनेचं वर्णन केलं जातआहे ती घटना म्हणजे भारतातील २०१० सालची दशवार्षिक जनगणना. लक्षावधी जनगणना कर्मचारी आणिअब्जावधी रुपये गुंतवून ही यंत्रणा भारताच्या अवाढव्य लोकसंख्येची क्रमवार माहिती एकत्रित करेल आणि एकराष्ट्रीय बायोमेट्रिक डेटाबेस आकार घेईल. लोकशाहीच्या या महायज्ञात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यातयेणार आहे. पहिल्या टप्प्यात नाव, गाव, जन्मतारीख, व्यवसाय, शिक्षण, घरासंबंधी माहिती अशा बाबींची नोंदकेली जाईल. पुढील वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकाचे छायाचित्र, हाताच्या बोटांचे ठसे आणि नेत्रपटलाचीआयरिस)प्रतिमा यांची नोंद केली जाईल. हे आहेत बायोमेट्रिक निकष.
बायोमेट्रिक्स हे एक किंवा अधिक विशिष्ट गुणधर्म तपासून एखाद्या व्यक्तीची बिनचूक ओळख निर्धारित करण्याचेतंत्रज्ञान आहे. असे गुणविशेष दोन प्रकारचे असतात : शारीरिक (फिजिओलॉजीकल)आणि वर्तनसंबंधीबिहेविअरल). शारीरिक गुणविशेष या प्रकारामधे हाताच्या बोटांचे ठसे, चेहऱ्याची ठेवण (फेशिअल फिचर्स), नेत्रपटल (आयरिस), हात/पंजाचा आकार, दृक्पटल (रेटिना), शरीरगंध, डीएनए वगैरे गुणधर्म विचारात घेतलेजातात. तर टंकलेखनाची लय (टायपिंग ऱ्हिदम/कीस्ट्रोक डायनामिक्स), चालण्याची ढब, आवाज हे वर्तनसंबंधीगुणविशेष आहेत. वरीलपैकी कोणता गुणधर्म बायोमेट्रिक गुणविशेष म्हणून वापरला जाऊ शकतो याचे काटेकोरनिकष आहेत. (१) प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुणधर्म असायला हवा. (२) गुणधर्मातील सापेक्ष फरकावरून कोणत्याही दोन व्यक्तींची अचूक ओळख ठरवता यायला हवी. (३) या गुणधर्मात वय/कालपरत्वे किंवा आजार/रोगामुळे फारबदल होता कामा नयेत. (४)या गुणधर्माची आवश्यक माहिती सहज गोळा करता यायला हवी. (५) या गुणधर्मावर आधारित प्रणाली ही अचूक, जलद आणि दणकट असावी. (६) अशी प्रणाली सुरक्षा विभाग आणि कर्मचारी/ग्राहकया दोहोंना स्वीकारार्ह असावी. (७) अशी प्रणाली गरजेनुसार पर्यायी बदल किंवा सुधारणा करण्यास सुलभ असावी.
हे निकष पाहता असे निदर्शनास येते की कोणतही एक गुणविशेष या सर्व निकषांवर उत्तीर्ण होत नाही. उदा. अपघात किंवा शस्त्रक्रियेमुळे हात काढावा लागला तर होताच्या बोटांच्या ठश्यांचा प्रश्नच येत नाही. खूप शारीरिककष्टाची कामे करणाऱ्या लोकांमधे हाताच्या त्वचेचा पोत बदलतो. सध्याच्या प्रगत जैवतंत्रज्ञान युगात डीएनएसिक्वेन्सिंग, जीन्स या संज्ञा सर्वतोमुखी आहेत. पण काही विशिष्ट परिस्थिती (गुन्हे प्रकटीकरण, विवादितजनकत्व) वगळता दैनंदिन वापरासाठी हा निकष उपयुक्त नाही. प्रत्येकाच्या जिभेचा ठसा वेगळा असतो हे माहीत असूनही हा बायोमेट्रिक निकष ठरत नाही कारण आधी कोणी तरी वापरलेल्या (खरं तर उष्टावलेल्या) पृष्ठभागावरआपली जीभ लावणं हा विचारसुद्धा नकोसा वाटतो. चेहऱ्याची ठेवण, आवाज हे वयानुसार किंवा अपघात, वैद्यकीयउपचार यामुळे बदलू शकतात किंवा बदलले जाऊ शकतात. प्लास्टिक सर्जरी करून नवीन चेहरा मिळालेलानायक/नायिका किंवा नायकाचाच चेहरा मिळवलेला खलनायक आणि नंतरच्या रोमहर्षक घडामोडी आपणकित्येक चित्रपटांमधून पाहतो. सध्या जोरदार बाजारपेठ असणारं एक उत्पादन म्हणजे निष्कलंक गोरेपणादेणाऱ्या क्रीम्स. आज काळपट, डागाळलेल्या चेहऱ्यानं फोटो काढा, आठवडाभर ठराविक क्रीम वापरा आणि आठव्या दिवशी तुमची त्वचा इतकी उजळलेली असेल की बायोमेट्रिक प्रणालीसुद्धा गोंधळून जाईल. हा झालाजाहीरातबाजीचा कळस. पण अशा गमजा बायोमेट्रिक प्रणालीसाठी घटक असतात. फोटो काढताना खरं तर जबरदस्तीनं स्मितहास्य करायला लावतात. पण तुम्ही Canada च्या पासपोर्टवर फोटो लावणार असाल तर असाफोटो अजिबात वापरू नका. कॅनडा सरकारच्या आदेशानुसार कोणताही भाव नसलेला (न्यूट्रल फेशिअलएक्स्प्रेशन) फोटोच पासपोर्टसाठी ग्राह्य समजला जातो.
कारण भरगच्च हास्य खेळवणारा चेहरा/फोटो चेहऱ्यावरून ओळख पटविणाऱ्या प्रणालीला संभ्रमात टाकतो. प्रत्येक व्यक्तीचे ठराविक कीस्ट्रोक्स हे त्याचं हस्ताक्षर/स्वाक्षरीइतकेच विशिष्ट असतात हे अभ्यासांती सिद्ध झालेलंआहे. पण निरक्षर किंवा टंकलेखन न येणाऱ्या व्यक्तींसाठी ही प्रणाली व्यर्थ आहे. तसेच आवाज हा शारीरिक गुणविशेष वाटला तरी आवाजावरून ओळख ठरविताना तो एक वर्तनसंबंधी गुणविशेष म्हणूनच गणला जातो. कारण कोणालाही ठराविक मर्यादेपर्यंत आपला आवाज बदलता येतो. तथापि iris scan हा निकष बहुतांशी उपयुक्तठरलेला आहे. वैद्यकीय प्रक्रियेद्वारे जरी नेत्रपटलाचा रंग आणि आकार यामधे थोडा फरक पडत असला तरीही यापटलाचे सूक्ष्म texture कायम राहते असं निरीक्षण आहे. अगदी ३० वर्षांच्या अवधीनंतरही iris scan जुळल्याचीउदाहरणं आहेत. विशेष म्हणजे लोकसंख्येच्या फक्त ०.२ टक्के प्रमाणात आढळणाऱ्या जुळ्या गुणासुत्रीय भावंडांमधेही नेत्रपटलाचे सूक्ष्म texture भिन्न असल्याचे आढळले आहे. पण तरीही काही मर्यादा आहेतच.
मग यावर मात कशी करायची? सोपं आहे. फक्त एक गुणविशेष न वापरता एकाच वेळी दोन किंवा अधिक गुणविशेष ओळख म्हणून समाविष्ट करायचे. जेणेकरून एखादा गुणविशेष जुळला नाही तरी उरलेल्या गुणविशेषांच्या आधारे ओळख पटवता येते. हाताच्या बोटांचे ठसे, आयरिस, चेहऱ्याची ठेवण, आवाज यापैकी दोन किंवा अधिक निकष प्रचलित आहेत. पुढच्या वर्षी प्रभागातील शिबिरामध्ये जाऊन हाताच्या दाही बोटांचे डिजिटलठसे आणि डोळे न मिचकावता नेत्रपटलाचा फोटो द्यायची तयारी ठेवा. कालांतराने हीच माहिती साठवलेले विशिष्टक्रमांकाचे बायोमेट्रिक ओळखपत्र सर्वाना मिळेल. ही असेल तुमची स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय ओळख जी तुम्हाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी उपयोगी पडेल. पण १५ वर्षापेक्षा लहान मुलाचं काय? अशा मुलांनादेखील विशिष्ट क्रमांक मिळेल जो त्यांच्या आई/बाबा/पालकांच्या क्रमांकाशी निगडीत असेल.
खोडी काढायची एका भावानं आणि मार मिळणार सुस्वभावी जुळ्या भावाला किंवा पोट दुखतंय एकीचं आणि औषध जुळ्या बहिणीला असे किस्से खरोखरच घडतात. यातील नाट्यमयतेचा भाग सोडला तर एक गोष्ट प्रकर्षानंजाणवते. आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या बाबतीत इतर सर्वांहून वेगळा आहे, खास आहे. शारीरिक गुणधर्म आणि दैनंदिन साचेबद्ध आयुष्य यापलीकडे जाऊन गुणात्मक, कलात्मक, भावनिक, वर्तनसंबंधी क्षमता विचारात घेतल्या तर हे निराळेपण अनेक पटींनी समोर उभं ठाकेल. आपल्यातलं वेगळेपण हीच तर आपली खासियत आहे, जगण्याचा आधार आहे. तेव्हा हा माझ्यापेक्षा उंच/माचो किंवा ही माझ्याहून गोरी/सडपातळ अशा अतिसामान्य तुलना करण्याऐवजी माणसा-माणसातलं वैविध्य निरखा, त्याचा आदर करा. आणि आपलं बायोमेट्रिक ओळखपत्र झळकावत अभिमानानं म्हणा 'माझ्यासारखा मीच' किंवा 'माझ्यासारखी मीच'.
डॉ. ज्योती पाटील (jrp2009@rediffmail.com)बायोमेट्रिक्स हे एक किंवा अधिक विशिष्ट गुणधर्म तपासून एखाद्या व्यक्तीची बिनचूक ओळख निर्धारित करण्याचेतंत्रज्ञान आहे. असे गुणविशेष दोन प्रकारचे असतात : शारीरिक (फिजिओलॉजीकल)आणि वर्तनसंबंधीबिहेविअरल). शारीरिक गुणविशेष या प्रकारामधे हाताच्या बोटांचे ठसे, चेहऱ्याची ठेवण (फेशिअल फिचर्स), नेत्रपटल (आयरिस), हात/पंजाचा आकार, दृक्पटल (रेटिना), शरीरगंध, डीएनए वगैरे गुणधर्म विचारात घेतलेजातात. तर टंकलेखनाची लय (टायपिंग ऱ्हिदम/कीस्ट्रोक डायनामिक्स), चालण्याची ढब, आवाज हे वर्तनसंबंधीगुणविशेष आहेत. वरीलपैकी कोणता गुणधर्म बायोमेट्रिक गुणविशेष म्हणून वापरला जाऊ शकतो याचे काटेकोरनिकष आहेत. (१) प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुणधर्म असायला हवा. (२) गुणधर्मातील सापेक्ष फरकावरून कोणत्याही दोन व्यक्तींची अचूक ओळख ठरवता यायला हवी. (३) या गुणधर्मात वय/कालपरत्वे किंवा आजार/रोगामुळे फारबदल होता कामा नयेत. (४)या गुणधर्माची आवश्यक माहिती सहज गोळा करता यायला हवी. (५) या गुणधर्मावर आधारित प्रणाली ही अचूक, जलद आणि दणकट असावी. (६) अशी प्रणाली सुरक्षा विभाग आणि कर्मचारी/ग्राहकया दोहोंना स्वीकारार्ह असावी. (७) अशी प्रणाली गरजेनुसार पर्यायी बदल किंवा सुधारणा करण्यास सुलभ असावी.
हे निकष पाहता असे निदर्शनास येते की कोणतही एक गुणविशेष या सर्व निकषांवर उत्तीर्ण होत नाही. उदा. अपघात किंवा शस्त्रक्रियेमुळे हात काढावा लागला तर होताच्या बोटांच्या ठश्यांचा प्रश्नच येत नाही. खूप शारीरिककष्टाची कामे करणाऱ्या लोकांमधे हाताच्या त्वचेचा पोत बदलतो. सध्याच्या प्रगत जैवतंत्रज्ञान युगात डीएनएसिक्वेन्सिंग, जीन्स या संज्ञा सर्वतोमुखी आहेत. पण काही विशिष्ट परिस्थिती (गुन्हे प्रकटीकरण, विवादितजनकत्व) वगळता दैनंदिन वापरासाठी हा निकष उपयुक्त नाही. प्रत्येकाच्या जिभेचा ठसा वेगळा असतो हे माहीत असूनही हा बायोमेट्रिक निकष ठरत नाही कारण आधी कोणी तरी वापरलेल्या (खरं तर उष्टावलेल्या) पृष्ठभागावरआपली जीभ लावणं हा विचारसुद्धा नकोसा वाटतो. चेहऱ्याची ठेवण, आवाज हे वयानुसार किंवा अपघात, वैद्यकीयउपचार यामुळे बदलू शकतात किंवा बदलले जाऊ शकतात. प्लास्टिक सर्जरी करून नवीन चेहरा मिळालेलानायक/नायिका किंवा नायकाचाच चेहरा मिळवलेला खलनायक आणि नंतरच्या रोमहर्षक घडामोडी आपणकित्येक चित्रपटांमधून पाहतो. सध्या जोरदार बाजारपेठ असणारं एक उत्पादन म्हणजे निष्कलंक गोरेपणादेणाऱ्या क्रीम्स. आज काळपट, डागाळलेल्या चेहऱ्यानं फोटो काढा, आठवडाभर ठराविक क्रीम वापरा आणि आठव्या दिवशी तुमची त्वचा इतकी उजळलेली असेल की बायोमेट्रिक प्रणालीसुद्धा गोंधळून जाईल. हा झालाजाहीरातबाजीचा कळस. पण अशा गमजा बायोमेट्रिक प्रणालीसाठी घटक असतात. फोटो काढताना खरं तर जबरदस्तीनं स्मितहास्य करायला लावतात. पण तुम्ही Canada च्या पासपोर्टवर फोटो लावणार असाल तर असाफोटो अजिबात वापरू नका. कॅनडा सरकारच्या आदेशानुसार कोणताही भाव नसलेला (न्यूट्रल फेशिअलएक्स्प्रेशन) फोटोच पासपोर्टसाठी ग्राह्य समजला जातो.
कारण भरगच्च हास्य खेळवणारा चेहरा/फोटो चेहऱ्यावरून ओळख पटविणाऱ्या प्रणालीला संभ्रमात टाकतो. प्रत्येक व्यक्तीचे ठराविक कीस्ट्रोक्स हे त्याचं हस्ताक्षर/स्वाक्षरीइतकेच विशिष्ट असतात हे अभ्यासांती सिद्ध झालेलंआहे. पण निरक्षर किंवा टंकलेखन न येणाऱ्या व्यक्तींसाठी ही प्रणाली व्यर्थ आहे. तसेच आवाज हा शारीरिक गुणविशेष वाटला तरी आवाजावरून ओळख ठरविताना तो एक वर्तनसंबंधी गुणविशेष म्हणूनच गणला जातो. कारण कोणालाही ठराविक मर्यादेपर्यंत आपला आवाज बदलता येतो. तथापि iris scan हा निकष बहुतांशी उपयुक्तठरलेला आहे. वैद्यकीय प्रक्रियेद्वारे जरी नेत्रपटलाचा रंग आणि आकार यामधे थोडा फरक पडत असला तरीही यापटलाचे सूक्ष्म texture कायम राहते असं निरीक्षण आहे. अगदी ३० वर्षांच्या अवधीनंतरही iris scan जुळल्याचीउदाहरणं आहेत. विशेष म्हणजे लोकसंख्येच्या फक्त ०.२ टक्के प्रमाणात आढळणाऱ्या जुळ्या गुणासुत्रीय भावंडांमधेही नेत्रपटलाचे सूक्ष्म texture भिन्न असल्याचे आढळले आहे. पण तरीही काही मर्यादा आहेतच.
मग यावर मात कशी करायची? सोपं आहे. फक्त एक गुणविशेष न वापरता एकाच वेळी दोन किंवा अधिक गुणविशेष ओळख म्हणून समाविष्ट करायचे. जेणेकरून एखादा गुणविशेष जुळला नाही तरी उरलेल्या गुणविशेषांच्या आधारे ओळख पटवता येते. हाताच्या बोटांचे ठसे, आयरिस, चेहऱ्याची ठेवण, आवाज यापैकी दोन किंवा अधिक निकष प्रचलित आहेत. पुढच्या वर्षी प्रभागातील शिबिरामध्ये जाऊन हाताच्या दाही बोटांचे डिजिटलठसे आणि डोळे न मिचकावता नेत्रपटलाचा फोटो द्यायची तयारी ठेवा. कालांतराने हीच माहिती साठवलेले विशिष्टक्रमांकाचे बायोमेट्रिक ओळखपत्र सर्वाना मिळेल. ही असेल तुमची स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय ओळख जी तुम्हाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी उपयोगी पडेल. पण १५ वर्षापेक्षा लहान मुलाचं काय? अशा मुलांनादेखील विशिष्ट क्रमांक मिळेल जो त्यांच्या आई/बाबा/पालकांच्या क्रमांकाशी निगडीत असेल.
खोडी काढायची एका भावानं आणि मार मिळणार सुस्वभावी जुळ्या भावाला किंवा पोट दुखतंय एकीचं आणि औषध जुळ्या बहिणीला असे किस्से खरोखरच घडतात. यातील नाट्यमयतेचा भाग सोडला तर एक गोष्ट प्रकर्षानंजाणवते. आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या बाबतीत इतर सर्वांहून वेगळा आहे, खास आहे. शारीरिक गुणधर्म आणि दैनंदिन साचेबद्ध आयुष्य यापलीकडे जाऊन गुणात्मक, कलात्मक, भावनिक, वर्तनसंबंधी क्षमता विचारात घेतल्या तर हे निराळेपण अनेक पटींनी समोर उभं ठाकेल. आपल्यातलं वेगळेपण हीच तर आपली खासियत आहे, जगण्याचा आधार आहे. तेव्हा हा माझ्यापेक्षा उंच/माचो किंवा ही माझ्याहून गोरी/सडपातळ अशा अतिसामान्य तुलना करण्याऐवजी माणसा-माणसातलं वैविध्य निरखा, त्याचा आदर करा. आणि आपलं बायोमेट्रिक ओळखपत्र झळकावत अभिमानानं म्हणा 'माझ्यासारखा मीच' किंवा 'माझ्यासारखी मीच'.
danik sakal -muktpeeth
No comments:
Post a Comment