ऑपरेशन ; ‘ब्रिंग बॅक ब्लॅक मनी’

देशातील भ्रष्ट राजकारणी, उद्योगपती आणि नोकरशहांनी अवैध मार्गाने कमाविलेली आणि परदेशात गुंतविलेली तब्बल ७० लाख कोटी रुपयांची संपत्ती परत भारतात आणण्याची एक महत्त्वाकांक्षी मोहीम काही निवृत्त सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशांनी सुरू केली आहे. ही मोहीम कदाचित जगातील सगळ्यात मोठी भ्रष्टाचारविरोधी मोहीम ठरण्याची शक्यता आहे. एका ढोबळ अंदाजानुसार ही रक्कम थोडीथोडकी नव्हे तर तब्बल७० लाख कोटी रुपयांची आहे. विशेष म्हणजे अलिकडेच अमेरिकेतील एका रीसर्च ग्रूपने जाहीर केलेल्याआकडेवारीनुसार २००० ते २००८ या अवघ्या आठ वर्षांत देशातील राजकारण्यांनी लाख कोटी रुपये भारतात कमावून परदेशात पाठविले आहेत.
माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी, ‘सुपरकॉपजे. एफ. रिबेरो, माजी हवाईदलप्रमुख एस. कृष्णस्वामी, माजीनिवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह आदी नामवंतांनी एकत्र येऊनइंडिया रिज्युव्हेनेशन इनिशिएटिव्हही चळवळ सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांत भारतातील भ्रष्ट राजकारणी, उद्योगपती, नोकरशहा आणि गुंडांनी लाखो कोटी रुपये देशाबाहेर पाठविले. विशेष म्हणजे हे सर्व पैसे या लोकांनी भारतातच कमावून बाहेर पाठविले आहेत. ही रक्कम ७० लाख कोटी रुपयांच्या घरात जाते, असा अंदाज आहे. हे सर्व पैसे परत भारतात आणण्याचा याचळवळीचा निश्चय आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेशातील आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्यातील सगळ्यात भ्रष्ट राजकारणी कोण या प्रश्नावर एक मतदान घेतले. त्यात ज्यांची नावे सगळ्यात वर होती त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरूझाली. या घटनेने या मोहिमेला मोठे बळ मिळाले. असेही घडू शकते, हा विश्वास या घटनेने दिला. या मोहिमेतील अनेकजण या संघटनेत सहभागी झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर अलीकडेच अमेरिकेतीलग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी’ (जीएफआय) या रीसर्च आणि सल्लागटाने एक अहवाल तयार केला असून त्यातील निष्कर्षांनुसार २०००ते २००८ या अवघ्या वर्षांत भारतातील भ्रष्टाचाऱ्यांनी तब्बल लाख कोटी रुपये देशात कमावून परदेशातपाठविले आहेत. हा अहवाल लवकरच प्रकाशित होत आहे.
credit :loksatta news

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...