दै. सकाळ , ६ सप्टेम्बर २०१०
न्याहळोद - भूगोल विषयात "एमए- बी. एड्.' पदवी घेतलेला 35 वर्षीय तरणाबांड मुलगा... पण अकालीच दोन्ही किडन्या निकामी झाल्याने कोणत्याही क्षणी गाठणाऱ्या मृत्यूशी झुंज देतोय. याचे अतीव दुःख पचविणारे आईवडील पोटच्या गोळ्याला जीवनदान देण्यासाठी स्वतःच्या किडन्या देण्यासाठी तयार आहेत; पण इथेही गरिबीच्या रूपात दुर्दैव आड येत आहे. पदरची शेतजमीन, घरदार विकूनही किडनीरोपणाची शस्त्रक्रिया होऊ शकतनाही. हे विदारक सत्य पचवीत आहेत विश्वनाथ (ता. धुळे) येथील प्रवीण पंढरीनाथ जाधव- बुवा या तरुणाचे असहाय्य आईवडील.
गरीब कुटुंबातील प्रवीणच्या किडन्या बदलाव्या लागतील किंवा जगण्यासाठी दर पंधरा दिवसांतून दोनदाआयुष्यभर "डायलिसिस' करावे लागेल. हा खर्च परवडणारा नसल्याने त्याने उपचार बंद केले आहेत. तरीहीकुटुंबाने त्याला जगविण्यासाठी शेती, गायी-म्हशी विक्रीला काढल्या आहेत.
कुटुंबाचे दारिद्य्र दूर व्हावे म्हणून प्रवीण पुण्याला नोकरीच्या शोधार्थ गेला. भूगोल विषयात "एमए- बी. एड्.' पदवीअसल्याने त्याने तेथे एका खासगी क्लासमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. पाच हजार रुपयांच्या मानधनातूनकाटकसर करत आईवडिलांना पैसेही पाठवीत होता. त्यात त्याला रक्तदाब, उलटीचा त्रास होऊ लागला. पुणे येथीलजहॉंगीर हॉस्पिटलला तपासणीनंतर दोन्ही किडन्यांचा आजार असल्याचे त्याला समजले. यामुळे त्याच्याकुटुंबावर आभाळच कोसळले.
जानेवारीत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्रवीणवर उपचार सुरू झाले. तेथे डॉक्टरांनी त्याला 5 ते 6 वेळाडायलिसिस' करण्याचा सल्ला दिला. हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे तो घरी परतला. आजार कमी झाल्याचेसांगून वृद्ध मातापित्याला, भावंडांना त्रास देणे टाळले. अशात प्रवीणने जून महिन्यात पुणे गाठत पुन्हा नोकरी सुरूकेली. पूर्वीप्रमाणे त्रास होऊ लागल्याने त्याला गावाकडे परतावे लागले आहे. आईवडिलांना प्रवीणचा त्रास असहाय्यझाल्याने त्यांनी येथील तज्ञांकडे पुनर्तपासणी केली. परंतु, लागणारा खर्च हा आवाक्याबाहेर ठरला. अनेकांनीप्रवीणने जवाहर मेडिकल फाउंडेशनला उपचार घ्यावा, असा सल्ला दिला. त्याप्रमाणे तेथे त्याच्यावरडायलिसिस'चे उपचार सुरू झाले.
पंधरा दिवसातून दोनदा "डायलिसिस'साठी येणारा खर्च परवडणारा नाही, म्हणून प्रवीणने तेथील उपचार आता बंदकेले आहेत. त्याला आयुष्यभर "डायलिसिस' करावे लागेल किंवा त्याच्या दोन्ही किडन्या बदलाव्या लागतील, असेफाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील यांनी सांगितले. मुलाला जगविण्यासाठी आईवडिलांनी स्वतःच्या किडन्यादान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्री. पंढरीनाथ व सौ. ताराबाई यांना मुलाच्या "ऑपरेशन'साठी येणारा खर्चपरवडणारा नाही. ही शस्त्रक्रिया नाशिक येथील ऋषीकेश व मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये होते. परंतु, स्वतःची शेतजमीन विकूनही दोन लाख रुपये उभे राहणार नाही, अशी स्थिती जाधव कुटुंबीयांची आहे.
असे असताना त्यांनी म्हैस व शेती विक्रीला काढली आहे. यातून पुढे कसे जगायचे यापेक्षा मुलाला कसे वाचवायचे, एवढीच काळजी त्यांना लागून आहे. शासकीय जीवनदायी योजनेतून मदत मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. प्रवीणच्या विवाहास सात वर्षे झाले आहेत. त्यांच्या जीवनमरणाच्या लढाईत आईवडिलांसह पत्नी शारदाबाई, भाऊरोहिदास खंबीरपणे पाठीशी उभे आहेत.
दानशूर पुढे आले तरच...
प्रवीणच्या जीवनमरणाच्या लढाईत गरिबीचा जय होतो की पराजय, हे काळच ठरवेल। पण या लढाईत जाधवकुटुंबीयांना समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांच्या आर्थिक मदतीची जोडमिळाली, तर प्रवीण नक्कीच जिंकणार आहे. " " मदतीसाठी दानशूर व्यक्ती प्रवीणच्या विश्वनाथ येथील पत्त्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9423916604 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य :अश्पाक खाटीक - सकाळ वृत्तसेवा
Showing posts with label dhule. Show all posts

आईसाठी मुले कंगाल; डॉक्टर मात्र बिनधास्त
धुळे - मुलांची आईमधील भावनिक गुंतवणूक वेगळीच असते. तिला दुखलं- खुपलं, तरी मुले अस्वस्थ होतात. उपचारासाठी जमीनजुमला, घरदार, दागदागिन्यांची किंमत आईपुढे शून्य ठरते. या नात्याचा गैरफायदा डॉक्टरकशा पद्धतीने घेऊ शकतो, याची समाजमन अस्वस्थ करणारी घटना रिक्षाचालक प्रकाश पोलादे या तरुणाच्यासंघर्षातून उजेडात आली आहे. आईवर चार चुकीचे "ऑपरेशन' झाल्याने दहा लाखांच्या खर्चापायी आम्ही कंगाल, तर तो डॉक्टर बिनधास्त आहे, असे प्रकाश व्यथित होऊन सांगतो आहे.
आईचे निरामय जीवन हिरावल्यानंतर न्यायासाठी दारोदारी हिंडतो आहे. संबंधित डॉक्टरला अद्दल घडविणे, असेप्रकार भविष्यात कुणाच्या नशिबी येऊ नये म्हणून लढा देताना आज ना उद्या न्याय मिळेल, अशी आशा आहे. मात्र, मागे हटण्यासाठी शासकीय यंत्रणेतील काहींसह संबंधित डॉक्टर दबाव, दमदाटी करत असल्याची प्रकाशचीकैफियत आहे. यामुळे कुटुंब दहशतीखाली वावरत आहे. आईला न्याय मिळत नाही, लादलेला भुर्दंड मिळत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची शपथ घेतल्याचे प्रकाशने सांगितले.
चौकशी अहवाल सादर
या प्रकरणी पोलादे कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाने स्वतंत्रपणे चौकशी करून अहवालग्राहक तक्रार न्याय निवारण मंचाकडे नुकताच सादर केल्याची माहिती हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेअधिष्ठाता तथा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. एस. गुप्ता यांनी "सकाळ'ला दिली. पालकमंत्री अब्दुल सत्तार वजिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्याकडेही संबंधित डॉक्टरविरुद्ध स्वतंत्र तक्रार पीडित पोलादे कुटुंबीयांनी दाखलकेली आहे. त्यांना न्याय दिला जाईल, असे श्री. मवारे यांनीही "सकाळ'ला सांगितले.
"ऑपरेशन'चे प्रयोग
धुळे शहरात गल्ली क्रमांक सातमध्ये मोहन पोलादे हे निवृत्त वाहन चालक राहतात. घरची स्थिती बेताचीच. मुलगाप्रकाश हा प्रथम मिनीडोअर चालवत होता. त्याची आई सुशीलाबाईंच्या पोटात दुखू लागल्याने प्रकाशसह भाऊअजय, अनिल यांनी 17 एप्रिल 2008 तिला आझादनगर हद्दीतील एका रुग्णालयात दाखल केले. तेथील एकाडॉक्टरने "ऍडमिट' करून घेत सुरवातीस कॅन्सरची गाठ, मग ऍपेंडिक्स फुटून गाठ, आतड्यास सूज, अशावेगवेगळ्या शंका व्यक्त करत, महागड्या तपासणी करत 25 एप्रिलला शस्त्रक्रिया केली. त्यात सुशीलाबाईंचीअन्ननलिका काढून फेकल्यानंतर ती पुन्हा दुसऱ्या "ऑपरेशन'व्दारे आतड्यांना "जॉइंट' करून दिली. त्या जागीलिकेज'चा प्रश्न उद्भवल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करून शौचालयाची जागा बदलून पोटाजवळ छिद्रे पाडले गेले. तीजागा देखील बरोबर न काढल्याने पुन्हा ऑपरेशन केले गेले. यातून काही चुकत असल्याचे, स्थिती गंभीर झाल्याचेलक्षात येताच "त्या' डॉक्टरने सुशीलाबाईंना धुळे येथील आस्था रुग्णालयात व नंतर मुंबई येथील केईएमरुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला. खर्च मी करेल, असे सांगून "त्या' डॉक्टरने जबाबदारी झटकली. प्रत्यक्षातत्याने पैसे दिलेच नाहीत, असे प्रकाश सांगतो.
आयुष्याची पुंजी गेली
अखेर सुशीलाबाई 14 मे 2010 ला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांची स्थिती पाहूनसंबंधित डॉक्टर हादरलेच. सुशिलाबाईंवर तेथे पुन्हा ऑपरेशन झाले. तेव्हापासून त्यांची प्रकृती जैसे थे आहे. त्यांनाचालता, फिरता येत नाही. खाल्लेले पचत नाही. लाखो रुपये खर्च करूनही आईला निरामय जीवन लाभले नाही. याविरुद्ध लढताना उलट "ब्लॅकमेलिंग'चे घृणास्पद आरोप केले जात असल्याने प्रकाश व्यथित झाला आहे. त्याच्यासांगण्यानुसार चुकीच्या चार ऑपरेशनमुळे आई सुशीलाबाईंच्या शरीराची आबाळ झाली आहे. यासह महागड्याऔषधोपचारामुळे आमच्याकडून आठ ते दहा लाख रुपये वसूल करण्यात आले. पैशाशिवाय उपचार नाही वरुग्णालयातून "डिसचार्ज' नसल्याने आईपुढे पैशाचे मोल न मोजता घर गहाण ठेवणे, चरितार्थाची सहा आसनीरिक्षा, हिरोहोंडा, तसेच दागदागिने विकण्याची वेळ आली. आयुष्यभराची पुंजी "त्या' डॉक्टरकडे सुपूर्द करावीलागल्याचे प्रकाशने सांगितले. आता तो भाड्याने रिक्षा घेऊन चरितार्थ चालवीत आहे.
सौजन्य :सकाळ वृत्तसेवा , २१ ऑगस्ट ,२०१० "

Subscribe to:
Posts (Atom)