कष्टकरी प्रवीणची जगण्यासाठी एकाकी झुंज

दै. सकाळ , ६ सप्टेम्बर २०१०
न्याहळोद
- भूगोल विषयात "एमए- बी. एड्‌.' पदवी घेतलेला 35 वर्षीय तरणाबांड मुलगा... पण अकालीच दोन्ही किडन्या निकामी झाल्याने कोणत्याही क्षणी गाठणाऱ्या मृत्यूशी झुंज देतोय. याचे अतीव दुःख पचविणारे आईवडील पोटच्या गोळ्याला जीवनदान देण्यासाठी स्वतःच्या किडन्या देण्यासाठी तयार आहेत; पण इथेही गरिबीच्या रूपात दुर्दैव आड येत आहे. पदरची शेतजमीन, घरदार विकूनही किडनीरोपणाची शस्त्रक्रिया होऊ शकतनाही. हे विदारक सत्य पचवीत आहेत विश्वनाथ (ता. धुळे) येथील प्रवीण पंढरीनाथ जाधव- बुवा या तरुणाचे असहाय्य आईवडील.

गरीब कुटुंबातील प्रवीणच्या किडन्या बदलाव्या लागतील किंवा जगण्यासाठी दर पंधरा दिवसांतून दोनदाआयुष्यभर "डायलिसिस' करावे लागेल. हा खर्च परवडणारा नसल्याने त्याने उपचार बंद केले आहेत. तरीहीकुटुंबाने त्याला जगविण्यासाठी शेती, गायी-म्हशी विक्रीला काढल्या आहेत.

कुटुंबाचे दारिद्य्र दूर व्हावे म्हणून प्रवीण पुण्याला नोकरीच्या शोधार्थ गेला. भूगोल विषयात "एमए- बी. एड्‌.' पदवीअसल्याने त्याने तेथे एका खासगी क्लासमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. पाच हजार रुपयांच्या मानधनातूनकाटकसर करत आईवडिलांना पैसेही पाठवीत होता. त्यात त्याला रक्तदाब, उलटीचा त्रास होऊ लागला. पुणे येथीलजहॉंगीर हॉस्पिटलला तपासणीनंतर दोन्ही किडन्यांचा आजार असल्याचे त्याला समजले. यामुळे त्याच्याकुटुंबावर आभाळच कोसळले.

जानेवारीत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्रवीणवर उपचार सुरू झाले. तेथे डॉक्टरांनी त्याला 5 ते 6 वेळाडायलिसिस' करण्याचा सल्ला दिला. हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे तो घरी परतला. आजार कमी झाल्याचेसांगून वृद्ध मातापित्याला, भावंडांना त्रास देणे टाळले. अशात प्रवीणने जून महिन्यात पुणे गाठत पुन्हा नोकरी सुरूकेली. पूर्वीप्रमाणे त्रास होऊ लागल्याने त्याला गावाकडे परतावे लागले आहे. आईवडिलांना प्रवीणचा त्रास असहाय्यझाल्याने त्यांनी येथील तज्ञांकडे पुनर्तपासणी केली. परंतु, लागणारा खर्च हा आवाक्याबाहेर ठरला. अनेकांनीप्रवीणने जवाहर मेडिकल फाउंडेशनला उपचार घ्यावा, असा सल्ला दिला. त्याप्रमाणे तेथे त्याच्यावरडायलिसिस'चे उपचार सुरू झाले.

पंधरा दिवसातून दोनदा "डायलिसिस'साठी येणारा खर्च परवडणारा नाही, म्हणून प्रवीणने तेथील उपचार आता बंदकेले आहेत. त्याला आयुष्यभर "डायलिसिस' करावे लागेल किंवा त्याच्या दोन्ही किडन्या बदलाव्या लागतील, असेफाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील यांनी सांगितले. मुलाला जगविण्यासाठी आईवडिलांनी स्वतःच्या किडन्यादान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्री. पंढरीनाथ सौ. ताराबाई यांना मुलाच्या "ऑपरेशन'साठी येणारा खर्चपरवडणारा नाही. ही शस्त्रक्रिया नाशिक येथील ऋषीकेश मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये होते. परंतु, स्वतःची शेतजमीन विकूनही दोन लाख रुपये उभे राहणार नाही, अशी स्थिती जाधव कुटुंबीयांची आहे.

असे असताना त्यांनी म्हैस शेती विक्रीला काढली आहे. यातून पुढे कसे जगायचे यापेक्षा मुलाला कसे वाचवायचे, एवढीच काळजी त्यांना लागून आहे. शासकीय जीवनदायी योजनेतून मदत मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. प्रवीणच्या विवाहास सात वर्षे झाले आहेत. त्यांच्या जीवनमरणाच्या लढाईत आईवडिलांसह पत्नी शारदाबाई, भाऊरोहिदास खंबीरपणे पाठीशी उभे आहेत.

दानशूर पुढे आले तरच...
प्रवीणच्या जीवनमरणाच्या लढाईत गरिबीचा जय होतो की पराजय, हे काळच ठरवेल। पण या लढाईत जाधवकुटुंबीयांना समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते सेवाभावी संस्थांच्या आर्थिक मदतीची जोडमिळाली, तर प्रवीण नक्कीच जिंकणार आहे.
‍ ‍ ‍ " ‍ " ‍ मदतीसाठी दानशूर व्यक्ती प्रवीणच्या विश्‍वनाथ येथील पत्त्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9423916604 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य :अश्‍पाक खाटीक - सकाळ वृत्तसेवा

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...