आईसाठी मुले कंगाल; डॉक्‍टर मात्र बिनधास्त

धुळे - मुलांची आईमधील भावनिक गुंतवणूक वेगळीच असते. तिला दुखलं- खुपलं, तरी मुले अस्वस्थ होतात. उपचारासाठी जमीनजुमला, घरदार, दागदागिन्यांची किंमत आईपुढे शून्य ठरते. या नात्याचा गैरफायदा डॉक्टरकशा पद्धतीने घेऊ शकतो, याची समाजमन अस्वस्थ करणारी घटना रिक्षाचालक प्रकाश पोलादे या तरुणाच्यासंघर्षातून उजेडात आली आहे. आईवर चार चुकीचे "ऑपरेशन' झाल्याने दहा लाखांच्या खर्चापायी आम्ही कंगाल, तर तो डॉक्टर बिनधास्त आहे, असे प्रकाश व्यथित होऊन सांगतो आहे.

आईचे निरामय जीवन हिरावल्यानंतर न्यायासाठी दारोदारी हिंडतो आहे. संबंधित डॉक्टरला अद्दल घडविणे, असेप्रकार भविष्यात कुणाच्या नशिबी येऊ नये म्हणून लढा देताना आज ना उद्या न्याय मिळेल, अशी आशा आहे. मात्र, मागे हटण्यासाठी शासकीय यंत्रणेतील काहींसह संबंधित डॉक्टर दबाव, दमदाटी करत असल्याची प्रकाशचीकैफियत आहे. यामुळे कुटुंब दहशतीखाली वावरत आहे. आईला न्याय मिळत नाही, लादलेला भुर्दंड मिळत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालता व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची शपथ घेतल्याचे प्रकाशने सांगितले.

चौकशी अहवाल सादर
या प्रकरणी पोलादे कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाने स्वतंत्रपणे चौकशी करून अहवालग्राहक तक्रार न्याय निवारण मंचाकडे नुकताच सादर केल्याची माहिती हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेअधिष्ठाता तथा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. एस. गुप्ता यांनी "सकाळ'ला दिली. पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्याकडेही संबंधित डॉक्टरविरुद्ध स्वतंत्र तक्रार पीडित पोलादे कुटुंबीयांनी दाखलकेली आहे. त्यांना न्याय दिला जाईल, असे श्री. मवारे यांनीही "सकाळ'ला सांगितले.

"ऑपरेशन'चे प्रयोग
धुळे शहरात गल्ली क्रमांक सातमध्ये मोहन पोलादे हे निवृत्त वाहन चालक राहतात. घरची स्थिती बेताचीच. मुलगाप्रकाश हा प्रथम मिनीडोअर चालवत होता. त्याची आई सुशीलाबाईंच्या पोटात दुखू लागल्याने प्रकाशसह भाऊअजय, अनिल यांनी 17 एप्रिल 2008 तिला आझादनगर हद्दीतील एका रुग्णालयात दाखल केले. तेथील एकाडॉक्टरने "ऍडमिट' करून घेत सुरवातीस कॅन्सरची गाठ, मग ऍपेंडिक् फुटून गाठ, आतड्यास सूज, अशावेगवेगळ्या शंका व्यक्त करत, महागड्या तपासणी करत 25 एप्रिलला शस्त्रक्रिया केली. त्यात सुशीलाबाईंचीअन्ननलिका काढून फेकल्यानंतर ती पुन्हा दुसऱ्या "ऑपरेशन'व्दारे आतड्यांना "जॉइंट' करून दिली. त्या जागीलिकेज'चा प्रश् उद्भवल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करून शौचालयाची जागा बदलून पोटाजवळ छिद्रे पाडले गेले. तीजागा देखील बरोबर काढल्याने पुन्हा ऑपरेशन केले गेले. यातून काही चुकत असल्याचे, स्थिती गंभीर झाल्याचेलक्षात येताच "त्या' डॉक्टरने सुशीलाबाईंना धुळे येथील आस्था रुग्णालयात नंतर मुंबई येथील केईएमरुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला. खर्च मी करेल, असे सांगून "त्या' डॉक्टरने जबाबदारी झटकली. प्रत्यक्षातत्याने पैसे दिलेच नाहीत, असे प्रकाश सांगतो.

आयुष्याची पुंजी गेली
अखेर सुशीलाबाई 14 मे 2010 ला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांची स्थिती पाहूनसंबंधित डॉक्टर हादरलेच. सुशिलाबाईंवर तेथे पुन्हा ऑपरेशन झाले. तेव्हापासून त्यांची प्रकृती जैसे थे आहे. त्यांनाचालता, फिरता येत नाही. खाल्लेले पचत नाही. लाखो रुपये खर्च करूनही आईला निरामय जीवन लाभले नाही. याविरुद्ध लढताना उलट "ब्लॅकमेलिंग'चे घृणास्पद आरोप केले जात असल्याने प्रकाश व्यथित झाला आहे. त्याच्यासांगण्यानुसार चुकीच्या चार ऑपरेशनमुळे आई सुशीलाबाईंच्या शरीराची आबाळ झाली आहे. यासह महागड्याऔषधोपचारामुळे आमच्याकडून आठ ते दहा लाख रुपये वसूल करण्यात आले. पैशाशिवाय उपचार नाही रुग्णालयातून "डिसचार्ज' नसल्याने आईपुढे पैशाचे मोल मोजता घर गहाण ठेवणे, चरितार्थाची सहा आसनीरिक्षा, हिरोहोंडा, तसेच दागदागिने विकण्याची वेळ आली. आयुष्यभराची पुंजी "त्या' डॉक्टरकडे सुपूर्द करावीलागल्याचे प्रकाशने सांगितले. आता तो भाड्याने रिक्षा घेऊन चरितार्थ चालवीत आहे.

सौजन्य :सकाळ वृत्तसेवा , २१ ऑगस्ट ,२०१०
‍ ‌ ‍‍ ‍ ‍ ‍‍ "‍‌ ‍ ‍ ‍ ‍

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...